TOC

This article is currently in the process of being translated into Marathi (~98% done).

About WPF:

What is WPF?

Windows Presentation Foundation, म्हणजेच WPF, ही .NET framework सोबत वापरता येणारी GUI मांडणीसाठी मायक्रोसॉफ्ट्ची सर्वात नवीन पद्धत आहे.

पण GUI मांडणी म्हणजे काय? तर GUI म्हणजे Graphical User Interface. आणि ह्या क्षणी तुम्ही बहुधा अशाच एका GUI कडे पहात आहात. Windows तुम्हाला तुमच्या संगणकासोबत काम करण्यासाठी GUI देतं, तर जिथे हा लेख तुम्ही वाचत आहात, तो browser ही तुम्हाला आंतरजालाची सैर करण्यासाठी GUI देतो.

GUI मांडणी तुम्हाला labels, textboxes आणि तत्सम विविध परीचित GUI घटक वापरून एखादं application बनवायला मदत करतं. GUI मांडणी नसेल तर तुम्हाला हे सर्व घटक स्वतःच आखावे लागतील आणि त्यासोबत text व mouse input सारखी वापरकर्त्यांसोबत बोलाचालही स्वतःच सांभाळावी लागेल. हे भरपूर काम आहे, त्यापेक्षा बरेचसे developers अशी GUI मांडणी वापरणं पसंत करतात, ज्यामुळे हे सरधोपट काम सांभाळलं जाईल आणि सुयोग्य असे applications बनवण्यावर developers लक्ष केन्द्रीत करू शकतील.

बर्‍याचशा GUI मांडण्या सध्या वापरात आहेत, पण .NET developers साठी सर्वात महत्वाचे आहेत ते WinForms आणि WPF. WPF सर्वात नवीन आहे, परंतु मायक्रोसॉफ्ट्ने अजूनही WinForms ची साथ सोडलेली नाही. ह्या दोघांमध्ये थोडाफार फरक असला, तरी त्यांचं काम एकच आहे: सुयोग्य GUI असलेली applications बनवणं सहजसोपं करणं. हे तुम्ही पुढल्या भागामध्ये पाहालंच.

पुढच्या भागात आपंण WinForms आणि WPF ह्यातला फरक पाहू.